Pimpri : भाजपचे आमदार व त्यांच्या पत्नीलाही कोरोना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील एका भाजपच्या आमदाराला कोरोनाची लागण झाली असून पत्नीही कोरोना बाधित आढळली आहे.

विशेष म्हणजे या आमदारांनी गेल्याच आठवड्यात फडणवीसांसह वायसीएममधील कोविड 19 विभागाला भेट दिली होती. तर पुण्यातील शरद पवार व अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीलाही उपस्थिती लावली होती. त्यामुळे चिंता वाढली आहे.

दरम्यान, हे आमदार व त्यांची पत्नी पिंपरीतील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here