Newasa : शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास याद राखा; शिवसेना खासदार लोखंडे यांचा गर्भित इशारा !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर खते – बियाणे देण्यासाठी कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांची अडवणूक करु नये. जर शेतकऱ्यांच्या अडवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ‘त्या’ अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा उत्तरनगर जिल्हा शिववसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासा फाटा येथे प्रतिनिधींशी बोलताना दिला.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरीभाऊ शेळके, शिवाजीराजे दिसागज हे उपस्थित होते. खासदार लोखंडे यांनी नेवासा येथे राष्ट्रीयकृत व सहकारी बँकाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आढावा घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिला. ते कर्ज आढावा बैठकीत बोलत होते. यानंतर ते नेवासा फाटा येथे प्रस्तूत प्रतिनिधींशी बोलत होते.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, शेतकरी थकबाकीदार असला तरी त्याला पीक कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये, असेही यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here