Ahmednagar : आडतेबाजार कंटेनमेंट झोन जाहीर 

12
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगर : आडतेबाजार आणि वंजार गल्ली येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आणखीे  प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा परिसर महापालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. आडतेबाजार आणि वंजार गल्ली भागात गेल्या दोन दिवसात सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

कोठला, ब्राम्हण कारंजा, अंबिका हॉटेल, हेमराज मेडीकल, रामचंद्रखुंट, अनिलकुमार पोखरणा ऍण्ड सन्स, तपकीर गल्ली, शामसुंदर रामचंद्र हेडा, रांका ट्रेडर्स, आडते बाजार कोपरा, जगदाळे ज्वेलर्स, गंजबाजार, मालु पेंट्स, मोहन ट्रंक डेपो, एस.एस मेहेर, फुटाणे गल्ली, संचेती साडी, पोपटानी एजन्सी, पाचलिंब गल्ली, कुबेर मार्केट, दाळमंडई, मीरा मेडिकल चौक, बॉम्बे फर्निचर, सीपी मुथ्था, ग्राहक भांडार चौक, राजेंद्र हॉटेल ते ब्राम्हण कारंजा असा कंटेनमेंट झोन राहील.

तसेच शनी गल्ली, झेंडीगेट, पोखरणा हॉस्पीटल सुभेदार गल्ली, नालबंदखुट, पिंजार गल्ली, पारशाखुट, जुना कापडबाजार, गंजबाजार, मोचीगल्ली, सारडागल्ली, कापडबाजार, शहाजीरोड,तांबटकरगल्ली, तेलीखुंट पॉवर हाउस, नालामस्जीद, स्मिता मेडीकल, तेलीखुंट, सर्जेपुरा चौक, मनपा शाळा, बेलदार गल्ली, मक्का मस्जीद, जे.जे.गल्ली, कोंडयामामा चौक, राज चेंबर, कोठला, हा परिसर बफर झोन म्हणून राहील.

या कंटेनमेंट झोनमधील सर्व अंतर्गत रस्ते पत्रे लावून बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी कोंड्यामामा चौकातील हॉटेल राजेंद्र परिसरात प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमधील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तर बफर झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापना व दुकाने चालू राहणार आहेत.

12 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here