Jalna : शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पूल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद

1

अदेश जारी

जालना – कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायययोजना नियम 2020 मधील तरतुदीनुसार जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरिकांची वाहतूक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पूल नागरिकांच्या रहदारीस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here