Akole : तालुका हादरला…! कोरोनाचा पहिला बळी…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अकोले तालुक्यातील कृषी उत्त्पन्न बाजार समितीजवळ राहणारा शहरातील नामवंत दुकानदाराच्या गाडीवर चालक असलेला व्यक्तीच्या मृत्यूच्या रुपाने तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी ठरला. तर आज बुधवारी सकाळी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील दोन रुग्णाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यात एकूण २७ रुग्ण झाले असून त्यापैकी १ मयत तर ४ जण उपचार घेत आहे. 

सुरूवातीला कोरोनामुक्त असलेल्या अकोले तालुक्यात हळूहळू कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. आज बुधवारी सकाळी अहमदनगर येथील लॅबमध्ये तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवती कोरोना बाधित आढळून आली आहे. ही दोन्ही मुंबईहून प्रवास करून ब्राम्हणवाडा येथे आले होते. त्यांना कॅारंटाईन केले असताना लक्षणे दिसल्याने त्यांना अहमदनगर येथे पाठविल्यानंतर तेथिल लॅबमध्ये तपासणी केली असता कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर रविवारी पॅाझिटीव्ह अहवाल आलेल्या अकोले शहरालगत कृषी उत्पन्न बाजारसमिती जवळ राहत असलेला एका नामवंत दुकानदाराकडे चालक असलेल्या व्यक्तीची काल मंगळवारी शारीरिक परिस्थिती खालावून नंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची खाञी लायक बातमी आहे. प्रशासनाने अद्याप बुधवारी सकाळपर्यंत जाहीर केले नाही.

या व्यक्तीच्या मृत्यूबाबत काल मंगळवारी दुपारीच शहरात चर्चा सुरू झाल्याने नागरीक भयबीत झाले होते. तर सद्या तालुक्यात एकुण कोरोना रुग्ण संख्या २७ झाली आहे त्यापैकी २२ जण कोरोना मुक्त झाले तर 1 जण मृत्यू पावला आहे तर 4 जण उपचार घेत आहे. तसेच अकोलेकरांसाठी समाधानाची बाब म्हणजे या मृ्त्यु झालेल्या बाधित व्यक्तीची पत्नी, मुलगा व इतर जवळच्या संपर्कातील दोन असे एकुण सहा व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.शहरासह तालुक्यातील लोकांनी घाबरुन जाऊ नये…!फक्त दक्षता घ्या ..!बाहेरून आलेल्यानी संस्थात्मक कॅारंटाइन व्हावे. माहिती लपवू नये..! लक्षणे वाटताच सरकारी रूग्णालयात दाखवावे, असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here