Shrirampur : खैरी निमगाव येथील संशयित युवती कोरोना पॉझिटिव

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

खैरी निमगाव –  श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील कोरोना विषाणूच्या एका संशयित रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीचा थुंकीनमुना तपासणीस पाठवला होता. तो पॉझिटिव आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे खैरी निमगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी रमेश धापते यांचेकडून देण्यात आली आहे.

दाखल करण्यात आलेली संशयित रुग्ण २३ वर्षीय युवती असून ती एका लग्नाला गेली. त्यानंतर तिला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे खबरदारी म्हणून या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा रिपोर्ट पॉझीटिव आला आहे.

दरम्यान, तिच्या संपर्कात अथवा ती ज्यांच्या संपर्कात आली त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आपला थुंकी नमुना देणे गावाच्या दृष्टीने महत्वाचे असून आम्ही तिच्या संपर्कातील प्रत्येकाचे थुंकीनमुने घेणार असून कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी गर्दी टाळावी, मोठे कार्यक्रम टाळावे, असे सगळ्यांना आवाहन करण्यात आले आहे. खोकला – शिंक ड्रॉपलेटसमधूनच कोरोनाचा पसार होतो. त्यामुळे काळजी घ्या. वारंवार हात धुवावे हाच कोरोनावर उपाय आहे. लोकांना जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे, अशी माहिती येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here