शिर्डी : यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने; उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक ०४ जुलै २०२० ते सोमवार दिनांक ०६ जुलै २०२० या काळात श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत असून कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्‍ताने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्री साईआश्रम येथे भव्‍य रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

डोंगरे म्‍हणाले, या वर्षी देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या  संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे दि.०४ जुलै ते दि.०६ जुलै २०२० याकालावधीत साजरा करण्‍यात येणारा श्रीगुरुपौर्णिमा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.  याकालावधीत कुठलेही सांस्‍कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्‍यात आलेला आहे.

गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक ०४ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.१५ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०५.३० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार दिनांक ०५ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.२५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक ०६ जुलै पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे मोठयाप्रमाणात रक्‍ताची उणीव भासत आहे. याकरीता श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍ताने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी दिनांक ०५ जुलै रोजी सकाळी ०९.०० ते सायं.०५.०० वाजेपर्यंत श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथे भव्‍य रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच ज्‍या रक्‍तदात्‍यांना प्‍लाझ्मा या रक्‍त घटकाचे दान करावयाचे आहे, अशा दात्‍यांनी आपली नावे साईनाथ रक्‍तपेढी, शिर्डी येथे नोंदवावी. याकरीता मो.नं.८६६९१४०६९३ व ०२४२३-२५८५२५ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी रक्‍तदान करणा-या इच्‍छुक रक्‍तदात्‍यांनी व संस्‍थान कर्मचा-यांनी या शिबीरात सहभागी व्‍हावे असे आवाहन डोंगरे यांनी केले.

4 COMMENTS

  1. I do love the way you have presented this particular difficulty and it really does provide me personally some fodder for thought. However, coming from everything that I have experienced, I simply trust as the opinions pile on that men and women stay on point and don’t embark upon a soap box regarding some other news of the day. Yet, thank you for this excellent piece and whilst I do not necessarily agree with it in totality, I value the point of view.

  2. Wow that was unusual. I just wrote an very long comment but after I clicked submit my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Regardless, just wanted to say excellent blog!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here