Shrigonda : राष्ट्रीय जनता दलातर्फे डिझेल, पेट्रोल दरवाढीबद्दल निषेध

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा – केंद्र सरकारने पट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड भाववाढ करुन राष्ट्रीय आपत्ती काळात जनतेवर अतिरीक्त बोजा टाकलेला आहे. भाजपाचे केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे महागाई वाढत गेल्याने जनता त्रस्त झाल्याने राष्ट्रीय जनता दलातर्फे डिझेल, पेट्रोल दरवाढ केल्या बद्दल केंद्र सरकारचा अप्पर तहसिलदार चारुशीला पवार यांना निवेदन देऊन श्रीगोंद्यात जाहीर निषेध करण्यात आला. 

या निवेदनामार्फत श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रीय जनता दलातर्फे डिझेल, पेट्रोल दरवाद तसेच वाढत चाललेल्या महागाईबद्दल केंद्र सरकारचा श्रीगोंद्याच्या अप्पर तहसिलदार चारुशीला पवार यांना निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त केला. पाठीमागील २३ दिवसांपासून सतत डिझेल व पेट्रोलचे भाव वाढत आहेत. पेट्रोल तब्बल ८७.१ ९ रुपये तर डिझेल ७९. ०० रुपये इतके उच्चांकी म्हणजे पेट्रोल ९. १७ रुपये व डिझेल ११.१५ रुपयाने वाढलेले आहे. पेट्रोलजन्य पदार्थाच्या भावावर केंद्र सरकारचे नियंत्रण असते.
लॉकडाऊनच्या काळात आगोदरच सामान्य जनता अतिशय आर्थिक संकटात आहे. सर्वसामान्यांना रोजचा खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनाच्या संकट काळात सदर इंधन दरवाढ त्वरीत मागे घ्यावी व महागाई कमी करुन केंद्र सरकारने देशातील सामान्य जनतेला दिलासा द्यावा यासाठी श्रीगोंदा येथे निवेदन दिले. यावेळी प्रदेश महासचिव रफिक इनामदार, मारुती पाचपुते, गोपाल घनवट, राजेंद्र भैलुमे, सुनील आढाव, अल्ताफ भाई मुजावर, जमीर पठाण यांच्या सह राष्ट्रीय जनता दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here