National Breaking : तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल प्लांट स्फोटात 6 जण मृत्यूमुखी

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

तामिळनाडू येथील न्यूवेली थर्मल प्लांटमध्ये आज पहाटे झालेल्या स्फोटात 6 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधी एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. 

प्लांटच्या स्टेज-2 मध्ये एका बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक कामगार अडकले होते. अपघात झाला त्यावेळी जवळपास 17 जण गंभीर जखमी होते. आता हाती आलेल्या माहितीनुसार या स्फोटात 6 जण मृत्यूमुखी झाले आहेत. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळविले.

या प्लांटमध्ये कोळशापासून वीज निर्मिती करण्यात येते. स्फोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here