Shrigonda : कोळगाव येथे ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

3
संपर्कातील ४ लहान मुलांसह १७ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी करिता नगर येथे पाठविले
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा – तालुक्यातील कोळगाव येथील पांढरेवाडी येथे ५५ वर्षा च्या वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झालेली असून महिलेच्या संपर्कातील १७ जणांना श्रीगोंदा येथे कोरोंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी करिता नगर येथे पाठविण्यात आले असून कोळगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण कोळगाव लॉक डाऊन करण्यात आले आहे. 

श्रीगोंदा शहर व तालुक्यातील येळपणे येथील कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पोहचला. काही काळ होण्याअगोदरच कोळगाव येथील पांढरेवाडी येथे ५५ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली. यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाची संपत आलेली साखळी पुन्हा एकदा सुरू झाली. महिलेच्या संपर्कात १७ जण आले असून त्यापैकी ४ जण हे लहान मुले असून त्यांना श्रीगोंदा येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीकरिता नगर येथे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती कोळगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमोल  यांनी सांगितले.
तसेच या महिलेवर उपचार करणारे कोळगाव येथील एका डॉक्टरांना देखील कोरोंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाचा रुग्ण कोळगाव येथे आढळून आल्याने संपूर्ण कोळगाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. पांढरेवाडी परिसरात आशासेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here