प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

उक्कलगाव – कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असतानाच ग्रामीण भागातही शिरकाव करायला सुरुवात केली आहे. राहूरी तालुक्यातील केसापूर येथील संशयित महिला, तिचा पती,आणि मुलाला तपासणीसाठी नगरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.
सिव्हिल रूग्णालयात भरती केलेल्या संशयित रूग्णाचे घशाचे स्त्राव घेण्यात आले होते. त्या तिघांचा आज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे केसापूरात कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिघे कोरोना बाधित रूग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले? कुठे -कुठे फिरले? यांचा शोध प्रशासन केसापूरात घेत आहे.
आज पुन्हा दुपारीच त्यातील कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या मित्रालाही सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यालाही नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे तिघे कोरोना पाॅझिटिव रूग्ण आढळून आल्याने केसापूरकारांची धाकधूक वाढली. बाधित रूग्ण सापडले असल्याने येथिल काही भाग सील करण्यात आला.