प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

उक्कडगाव – सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व कुकडी एज्युकेशन त सोसायटीचे सावित्रीबाई कला महाविद्यालय पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा. अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व माननीय आमदार राहुल दादा जगताप पाटील यांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून, अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
बेलवंडी पोलीस स्टेशन बेलवंडी बुद्रुक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेलवंडी बुद्रुक या ठिकाणी (21 मे) मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पिंपळगाव पिसा येथील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव पिसा (29 मे) येथील सर्व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच एरंडोली ग्रामपंचायत एरंडोली (19 जून) या ठिकाणी कर्मचारी व गावातील लोकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
विसापूर ग्रामपंचायत विसापूर येथील कर्मचारी व गावातील लोकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप (18 जून) करण्यात आले. पिंपळगाव पिसा येथील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप (30 जून) करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. ढगे व उपप्राचार्य डॉ. शांतीलाल घेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. डी. शितोळे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. बी.आर.पंदरकर व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. एम.शेटे, डॉ. एस आर दुधकवडे माजी विद्यापीठ प्रतिनिधी केशव कातोरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी रोहित कांबळे, दीपक मगर, आकाश पथवे, किरण घाडगे, ऋग्वेद शिंदे, अक्षय जठार, प्रगती शिंदे, सागर ढगे, प्रवीण तोंडे, सुद्रिक रसिका, आशा शेख, नेहा शिंदे, सिमरन पठाण, कोमल जगताप, वैशाली शिरसे, सारिका घोंडगे इत्यादी विद्यार्थ्यांच्या सहभागातून महाविद्यालयाच्या परिसरात सामाजिक बांधिलकी जपत वरील उपक्रम राबविण्यात आले. उपक्रम कालावधीत सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले.