Beed : अंत्योदय योजनेअंतर्गत जुलै ते सप्टेंबरसाठी ११९१ क्विंटल साखर मंजूर 

34
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड – जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2020 साठी अंत्योदय लाभार्थ्यांना करिता मागील जून अखेर शिल्लक ६६८ किंटल आणि जुलै ते सप्टेंबर ५२३ क्विंटल एकूण ११९१  क्विंटल साखर नियतन मंजूर केले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून ग्रुप गणेश ट्रेडिंग कंपनी बीड यांची नियुक्ती शासनाने केली आहे.
जुलै ते सप्टेंबर 2020 साठी बीड जिल्ह्यातील कुटुंबातील कार्डधारकांसाठी प्रति कार्ड एक किलोग्राम या परिमाणात साखर वितरणासाठी ५२३  क्विंटल व मागील शिल्लक ६२५ क्विंटल असे  पुरवठा कंपनी यांच्यामार्फत जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी शासकीय धान्य गोदामात साखर पुरवठा करण्यात येत आहे.
 तालुका व महिना प्रमाणे मंजूर एकूण नियतनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आले आहे. याप्रमाणे एकूण ११९१ क्विंटल साखर नियतन पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी कळविले आहे.

34 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here