Entertainment : गुलाबो-सिताबोनंतर आता लक्ष्मी बॉम्ब, भूज यासह आणखी 5 चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहांवर बंदी असल्याने अनेक निर्माते आता ऑनलाईन अॅप्सवर ओटीटी तत्वावर प्रदर्शित करीत आहेत. काही दिवसांपूर्वी गुलाबो-सिताबो हा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. त्याला उत्कृष्ट यश मिळाले. 

तर आता अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब, अजयचा भूज-द प्राईड ऑफ इंडिया, यासह आलिया भट्टचा ‘सड़क 2’, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’, कुणाल खेमूचा कॉमेडी चित्रपट ‘लूटकेस’, विद्युत जामवालाचा ‘खुदा हाफिज’ आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हे चित्रपट डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत.

लक्ष्मी बॉम्ब हा अक्षयच्या चित्रपटाचे अधिकार डिझनीने तब्बल 125 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर अजयच्या भूजचे अधिकार 112 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे. मोठ्या पडद्याचे आकर्षण असले तरी मोबाईलवर किंवा स्मार्ट टीव्हीवर घरबसल्या हे चित्रपट पाहता येणार असल्याने चाहते आनंदात आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here