Maharashtra : सोन्याच्या दराने गाठले अर्धशतक, 50 हजार 282 रुपये तोळा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जगभरात सध्या कोरोना महामारीमुळे आर्थिक मंदी आल्यासारखीच परिस्थिती आहे. अशात सोने मात्र सोन्यासारखे झळाळत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दराने अर्धशतक गाठले आहे. सोन्याचे मुंबई येथील भाव प्रति तोळा (10 ग्राम) 50 हजार 282 रुपये तोळा झाले आहे. 

सोन्याचा भाव जरी 50 हजार 282 असला तरी जीएसटी धरून हे भाव 51 हजार 782 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे. तर चांदीचे भाव देखील 50 हजाराच्या पार गेले आहे. कोरोनामुळे भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला ग्राहक पसंती देत आहेत. तर देशात सध्या सोन्याची आयात घटली आहे. तर जगभरात असलेल्या सोन्याच्या खाणीमध्ये कामगरांची कमतरता भासत आहे. यामुळे देखील हे दर वाढत आहे.

अशीच परिस्थिती राहिल्यास सोन्याचे भाव नजिकच्या काळात आणखी वाढतील. 55 हजारांपर्यंत हे दर वाढू शकतात असा अंदाज सराफ बाजारातून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here