Shrigonda : कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त लिंपणगावात कृषी चर्चासत्र

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – राज्याच्या कृषी विभागाने 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्याचे ठरवले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांच्या वतीने कृषी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी  सरपंच रवी उजागरे, उपसरपंच पोपट माने, दादासाहेब कुरुमकर, प्रवीण कुरुमकर, नानासाहेब होले, बबनराव बडवे, आदी उपस्थित होते.

खरीप हंगामामध्ये शेतकरी विविध पिकांची पेरणी करतात पेरणीच्या कालावधीमध्ये त्यांना पिकांच्या लागवडीबाबतची माहिती बीज प्रक्रिया तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी संजीवनी सप्ताह हे अभियान चालू केले आहे.

आज लिंपणगाव येथे या अभियानाच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्यांमध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असल्याने कोरोनाबाबत आवश्यक ती काळजी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी  कृषी सहाय्यक संतोष झेंडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच बीज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here