Shevgaon : कोरोना संशयित किंवा कोरोनाग्रस्त दिव्यांगांना विशेष सुविधा पुरवण्याची सावलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

4
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – राज्यात दिव्यांग बांधवांची संख्या जवळपास सत्तर लाखाच्या आसपास आहे. कोरोना महामारीचा मोठा परीणाम दिव्यांग बांधवाच्या शारीरीकतेवर झालेला आहे. दिव्यांग बांधवही या महामारीतून सुटलेला नाही. ज्यावेळेस दिव्यांग बांधवाच्या घराजवळ अथवा नात्यातील व्यक्ती कोरोना संक्रमित आढळून येते. त्यावेळेस परिसरातील सर्वांचीच कोरोना चाचणी जिल्हा शासकीय रूग्णालयात बोलावून करण्यात येते. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीलाही बोलावण्यात येते. परंतु त्यांची जाण्या-येण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत नाही.

तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवस लागतात. तो पर्यंत प्रशासनाच्या देखरेखीखाली शासकीय रूग्णालयात ठेवण्यात येते. तेथेही दिव्यांगांना कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. जसे व्हीलचेअर, सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृह आदी दुसरी बाब ज्या परिसरामध्ये कोरोनाचे जास्त रूग्ण आढळून येतात. तो एरिया कंटेनमेन्ट परिसर म्हणून घोषित होतो व तेथील सर्व सेवा बंद करण्यात येतात. अशा परिसरात राहत असलेल्या दिव्यांग बांधवांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात ही वस्तुस्थिती आहे.

यासारख्या अनेक अडचणींबाबत सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेने सरकारचे लक्ष वेधले. राज्यात कोठेही कोरोना संशयित किंवा कोरोनाग्रस्त दिव्यांग बांधव आढळून आल्यास त्याची स्वतंत्र तपासणी करून त्याची स्वतंत्र नोंद ठेवण्यात यावी व कंटेेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या दिव्यांग व्यक्तीला अन्नधान्य, खाण्यापिण्याचे सामान, गरजेचे औषधी प्रशासनामार्फत विनामुल्य पुरवण्यात याव्यात, अशी मागणी सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चाँद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, खलील शेख, मनोहर मराठे, गणेश महाजन, सुनील वाळके, अशोक कुसळकर, गोविंद बाहेती, अनिल विघ्ने, एकनाथ धाने, नरहरी बर्डे, बाबासाहेब गडाख, सोनाली चेडे,संजीवनी अदमाने, आदी दिव्यांग बांधव यांनी केली आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here