Ahmednagar Breaking Corona Updates : जिल्ह्यात २१ रुग्णांची कोरोनावर मात तर आणखी १० रुग्ण वाढले

५७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर – जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात, नगर मनपा ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे  जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ झाली आहे. दरम्यान आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज जिल्ह्यातील २१ रुग्ण बरे झाले. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
आज जिल्ह्यातील ५७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. सध्या एकूण नोंद रुग्ण संख्या ५१० इतकी झाली आहे.
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)*

श्रीरामपूरातील  पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह शहरात खळबळ

शहरातील चोथाणी हॉस्पिटल परिसरातील एक जण बाधित सापडल्यानंतर त्याला विलगिकरणकक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या संपर्कातील 17 जणांना विलगिकरणकक्षात ठेऊन त्यांचे श्राव घेतले होते. त्यापैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here