Shrigonda : बियाणे आणायला गेला आणि किरकोळ वादात जीव गेला

0
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील रुईखेल रोड तरटे वस्ती या ठिकाणी सुनील माणिक तरटे हे शेतीच्या पेरणीसाठी बियाणे आणण्यासाठी घॊगरगाव या ठिकाणी जात असताना नात्यातील दोघांसोबत किरकोळ वाद झाले. या वादात सुनील तरटे यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय सुनील तरटे याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील तरटे वस्ती रुईखेल या ठिकाणी राहणारे सुनील माणिक तरटे हे शेती करून आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवतात मागील दोन दिवसात घोगरगाव परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याची पेरणीची लगबग सुरु झाली होती. त्यामुळे मयत सुनील माणिक तरटे वय ४५ हे बाजरीचे बियाणे घेण्यासाठी आपल्या दुचाकी वरून घॊगरगाव या ठिकाणी जात असताना रस्त्यात त्याचा मित्र अनिल शेलार हे भेटले. त्यांनी उगले याच्या दुकानातून स्वॅप मशीनवर १ हजार रुपये काढले व सावतामाळी पानटपरी जवळ पाण्याचा गुळणा करत असताना ११ च्या सुमारास नगर सोलापूर रोडच्या कडेला उभा होता.
त्यावेळी रोहित रमेश तरटे व शुभम रमेश तरटे हे दोन मोटारसायकल वर सुनिल जवळ आले आणि मयत सुनील ला अर्व्वाच भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यावर मयत सुनील त्यांना बोलला कशाला शिव्या देतोस तुला घाई असेल तर तू जा त्यावर रोहितने त्याच्या गुप्त अंगावर पायाने मारले त्यानंतर सुनील हा रस्त्यावर कोसळला आणि त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तरीही सुनील स्वतःला सावरत पुन्हा उभा राहिला तेव्हा शुभम याने त्याच्या छातीवर जोरात लाथ मारली. सुनील पुन्हा रस्त्यावर कोसळला त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने सुनील पुन्हा उठलाच नाही. जागीच ठार झाला सुनील कोणतीही हालचाल करत नाही, हे पाहून शुभम आणि रोहित यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
त्यानंतर मयत सुनीलचा मित्र त्याजवळ गेल्यावर सुनील मयत झाला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाबाजुंच्या लोकांना बोलावून रस्त्यावरील मयत सुनीलचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला घेतला आणि याबाबत पोलिसांना कळविले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचले. घटनेचा पंचनामा करून अक्षय सुनील तरटे यांच्या फिर्यादी वरून रोहित रमेश तरटे शुभम रमेश तरटे यांच्यावर भादंवि ३०२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here