Ahmednagar : निकृष्ट दर्जाचं काम आढळल्यास कॉन्ट्रॅक्टरवर तातडीने कारवाई – आमदार संग्राम जगताप

3

सार्वजनिक बांधकम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

सार्वजनिक बांधकाम विभागात आमदर संग्राम जगताप यांनी सहकारनगरमधील चुकीच्या पद्धतीने झालेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान सहकारनगर येथे निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने झालेल्या रास्ताची कामे सार्वजनिक बांधकामाचे शाखा अभियंता बापूसाहेब वराळे यांच्या निदर्शनास आणून देत चुकीच्या पद्धतीने कामे करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.

यावेळी सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, कैलास येवले, प्रशांत चौधरी, अभिजित खोसे, बाबा वाडकर संभाजी पवार, शेखर जी तुंगार यांच्यासह स्थानीक नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, सपकाळ हॉस्पिटल परिसर, सहकारनगरमधील रस्त्याची कामे प्रलंबित आहे. मात्र अनेक कामे ही चुकीची व निकृष्ट दर्जाची झाली असल्याची तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे केली होती. त्यानंतर आम्ही तेथील सर्व परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर आज तातडीने या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सहकार नगर मधील तातडीने कामे मार्गी लावा. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यावर तातडीने कारवाई करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here