Jalna : मंठ्यातील निर्घृण हत्येप्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती करा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

0
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

मंठा शहरात अत्यंत थरारक कृत्या वैष्णवी गोरे नामक नवविवाहित तरुणीचा भर दिवसा बाजार मैदानात चाकूने मानेवर हातावर वार करून शेख अश्पाक शेख बाबू या नराधमाने निर्घृण हत्या केली असून या प्रकरणात मयत वैष्णवी गोरे यांच्या बाजूने महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करावी व फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालून लवकरात लवकर या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केली.

दोन दिवसापूर्वी मंठा शहरात भरदिवसा बाजार मैदान नवविवाहित तरुणी वैष्णवी गोरे हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. ही बाब सर्वच समाजांना काळीमा फासणारी असून जातीय सलोखा बिघडवणारी आहे. परंतु सर्वधर्मीय लोकांनी मानवता धर्माचे पालन करत जातीय सलोखा राखावा व सर्वांनी मयत तरुणी वैष्णवी गोरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून हत्या करणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले.
मंठा शहरातील हत्या प्रकरण ही एवढी गंभीर बाब आहे की यामध्ये कोणताही पक्ष राजकारण करणार नाही परंतु तरीदेखील पोलीस बांधवांनी जर त्यांच्यावर काही राजकीय दबाव येत असेल तर त्याला न जुमानता मयत वैष्णवी गोरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here