प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांच निधन झाले. मुंबईच्या वांद्य्रातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 71 व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला.
सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गुरु नानक रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सरोज खान यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
श्रीदेवी ते आलिया भट अशा सर्वच अभिनेत्रींना त्यांनी डान्स शिकवले. कोरिओग्राफी करण्याआधी 50च्या दशकात सरोज खान बँकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होत्या. 1974मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गीता मेरा नाम’मध्ये त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी बॉविवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना डान्स करायला शिकवलं.
त्यांनी आतापर्यंत जवळपास 2 हजारांहून अधिक गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. मिस्टर इंडिया चित्रपटातील श्रीदेवीचे हवाहवाई हे गाणे खूप गाजले. त्यानंतर सरोज यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या कोरिओग्राफीने बॉलिवूड बहरला. माधुरीला धक-धक गर्ल बनवणा-याही त्याच. सरोज खान यांनी माधुरी दीक्षितचं सर्वात लोकप्रिय झालेलं गाणं ‘धक धक करने लगा’ हेदेखील कोरिओग्राफ केलं होतं. बेटा चित्रपटातील या गाण्यानंतर माधुरी दीक्षितला चाहते धक धक गर्ल म्हणून ओळखू लागले.
कशा झाल्या निर्मला च्या सरोज खान
निर्मला साधु सिंह नागपाल हे सरोज खान यांचे मूळ नाव. घरातील गरीब परिस्थितीच्या कारणाने त्यांनी फक्त वयाच्या तिस-या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. नजराना या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले.
त्याकाळचे प्रसिद्ध नृत्यकार बी. सोहनलाल यांच्याकडून कथ्थक, मणिपुरी, कथकली, भरतनाट्यम इत्यादी नृत्य प्रकारचे प्रशिक्षण घेतले. त्या तेव्हा 13 वर्षाच्या होता. यावेळी त्यांनी 41 वर्षीय सोहनलाल यांच्याशी विवाह केला. मात्र विवाहानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात अंतर पडून सोहनलाल त्यांना कायमचे सोडून निघून गेले. त्यानंतर त्यांनी सरदार रोशन खान यांच्याशी विवाह केला. खान हे मुसलमान असल्याने त्यांनीही इस्लाम स्वीकारून सरोज खान हे नाव धारण केले. या दोघांना एक कन्यारत्नही प्राप्त झाले. ही कन्या सध्या दुबईमध्ये डान्स क्लास चालवते.
त्यांच्या जाण्याने बॉलिवूडचा डान्स सूना-सूना झाला आहे.
Tjqaum – azithromycine Sqrjqi vltzqj