Pathardi : कोरोनामुळे संपूर्ण शहर १० दिवस कडकडीत बंद

1

प्रतिनिधी |वजीर शेख | राष्ट्र सह्याद्री 
 
पाथर्डी शहरात वामन भाऊ नगर भागात एक ३५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे यांनी दिली. यामुळे सर्व शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाथर्डी शहर १० दिवस बंद राहील, असे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवामध्ये दवाखाना व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे आव्हान तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले आहे.

यावेळी पाथर्डी पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. रत्नपारखी व सर्व पोलिस स्टाफ यांनी जागोजागी बॅरिकेटर लावून चोख बंदोबस्त करत आहेत. तरी १० तारखेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. तसेच विनाकारण फिरू नये, असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. रत्नपारखी यांनी सांगितले. यासाठी दादा तांबे, अमोल कर्डिले व सर्व पोलिस स्टाफ रात्रंदिवस बंदोबस्त करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here