Rahuri : लग्नाला गेले आणि कोरोना घेऊन घरी आले; केसापूरात आणखी एका रुग्णाची भर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी तालुक्यातील केसापुरात तीन रुग्णाच्या पाठोपाठ चौथा रुग्ण बाधित निघाला आहे. तर वांबोरीत कोरोनो वेशी बाहेर थांबला. राहुरी तालुक्यातील केसापुर येथील कुटुंब मुंबई येथील ठाणे येथे लग्नासाठी गेले आणि कोरोनाचा आहेर गावात घेऊन आले. त्यांच्या सर्पकांतील व्यक्तींचा शोध प्रशासन घेते आहे. तीन रुग्णवाहिकेतून सर्पकांतील व्यक्ती स्ञाव तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावरती विश्वास ठेवू नये. तसेच शासनाने दिलेल्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आव्हान राहुरी तहसीलदार तहसीलदार फैसियोद्दीन शेख यांनी केले आहे. केसापूर गाव लॉकडाऊन आले आहे. शुक्रवारी दुपारी एक रुग्ण कोरोबाधित आढळला आहे. तर दुसरा व्यकती वांबोरी येथील रहिवासी असले तरी तो मुंबई येथील पनवेल येथे नोकरीला आहे.  गावात येण्या अगोदर रुग्णालयात दाखल झाल्याने वांबोरी गावाचा धोका टळला असल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

केसापूर येथे तहसीलदार एफ. आर. शेख व पोलीस निरीक्षक  मुकुंद देशमुख  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ आदींनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here