Jalna :  रविवारपासून 15 जुलैपर्यंत शहर लॉकडाऊन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना शहरात रविवारी रात्री 12 वाजेपासून दहा दिवसासाठी म्हणजे 15 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज शुक्रवारी एका बेठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी आमदार कैलास गोरंटयाल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, मुख्याधिकारी नार्वेकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर घेण्यात आला आहे.

जालन्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने किमान जालना शहरात लॉकडाऊन करावे, अशी अपेक्षा जालना शहरातील व्यापारी, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि सामान्य लोकांमधून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनातर्फे आजच तातडीने जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here