Covid 19 Vaccine : 15 ऑगस्टपर्यंत भारतातील पहिली कोरोना लस बाजारात उपलब्ध करण्याचा आयसीएमआरचा मानस

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारतातील पहिली कोरोना लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. आयसीएमआरने लस परिक्षण आणि चाचणीचा वेग वाढवला असून 15 ऑगस्टपूर्वीच याबाबतच्या सर्व चाचण्या पूर्ण होण्यासाठी संबंधित संस्थांना आदेश देण्यात आले आहेत.

आयसीएमआरने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडेटसोबत भागीदारी करत कोरोना लस उपलब्ध करण्याचं काम हाती घेतलं आहे. या कामाला पहिलं प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच या कामात हलगर्जपणा करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोरोनावरील लस बीबीव्ही 152 कोविड लस माणसांना देऊन त्याचा मानवी शरीरावरील परिणाम तपासला जाणार आहे. यासाठी जवळपास 10-12 वेगवेगळ्या संस्थांना हे काम देण्यात आलं आहे, अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. आयसीएमआरने या संस्थांना हे काम करताना सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. तसेच सरकारसाठी हे पहिलं प्राधान्य असून या कामावर सरकारचं संपूर्ण लक्ष असल्याचंही या संस्थांना सांगण्यात आलं आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here