Shrigonda : अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

27

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तहसील कार्यालयात अंगणवाडी सेविकांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, पेन्शन यासह विविध प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्याच्या अप्पर तहसिलदार चारुशीला पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देत आंदोलनं केले.

देशभरातील अंगणवाडी कर्मचारी हे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरही आपला जीव धोक्यात घालून कोरोना संघर्षात आघाडीवर आहे. कोरोना महामारीत अगंणवाडी कर्मचारी हे प्रकल्पाची व शासनाने दिलेले विविध स्वरूपाचे कामें प्रामाणिकपणे पार पाडत आहे. मात्र, आजही अंगणवाडी कर्मचारी अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. देश कोरोना महामारीशी लढा देत असताना अंगणवाडी सेविका व मदतनिस या महामारीत आघाडीवर राहून काम करत आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी, पेन्शन यासह विविध प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचारी गेली ४५ वर्ष मानधनावर आहेत.

मात्र, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून सेविकांना तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी मानून अनुषंगिक फायदे मिळावेत, प्रति दिन , प्रति लाभार्थी ८ रुपये आहारासाठी खर्च होतात. यात धान्य खरेदी, इंधन खर्च, खरेदीसाठी प्रवास खर्च आणि मेहनताना गृहीत आहे. त्यामुळे आहाराची खरेदी ४ ते ५ रुपयांचे आसपास ठरते. ज्यातून चांगल्या प्रकारचा आहार देणे अशक्य आहे. म्हणून आहाराचा दर दुप्पट करावा. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे दोन – तीन वर्षांनी मिळतात. तर अनेक जिल्हयातील निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पैसे अदयाप मिळालेले नाहीत.
निवृत्ती वेतन देयके देण्याची सोय जिल्हा किंवा तालुका पातळीवर मिळण्याची सोय व्हावी. सर्व कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी ५० लाख रुपयांचे विमा कवच शासनाने दिले आहे. पण कोरोनाचा वाढता आलेख पाहता ही महामारी आणखी किती कालावधीत आटोक्यात येईल हे सांगणे कठीण आहे. म्हणून हे विमा कवच संपूर्ण कोरोना काळासाठी करावे व केवळ कोरोना नव्हे तर त्याच्या भीतीने किंवा अनुषंगाने येणाऱ्या ब्रेन हॅमरेज, अपघात, हार्ट अटॅक इ. सर्व रोगांसाठी विमा कवच विस्तारित करावे.
ग्रामविकास मंत्र्यांनी मार्च , एप्रिल व मे २०२० या ३ महिन्यांसाठी दरमहा १००० रुपये आपत्कालीन प्रोत्साहन अनुदान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्राम पातळीवर १४ व्या वित्त आयोगाच्या रक्कमेतून ग्रामपंचायतीने द्यावे, असे सांगितले असताना ग्रामपंचायतींनी फक्त एकदाच १००० रुपये दिलेले आहेत. तर नागरी प्रकल्प आणि नगरपंचायती, नगरपालिका येथे पैसे मिळाले नाहीत. अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वयोमानामुळे कमी झालेली दिसते. त्यांना अलगीकरण किंवा सर्वेसाठी ड्युटीला लावणे म्हणजे घरोघरी जाऊन सर्वे करण्याच्या कामातून वगळण्यात यावे.
यासह अनेक मागण्या संदर्भात श्रीगोंदा येथे अप्पर तहसिलदार चारुशीला पवार यांना मागण्यांचे निवेदन देत आंदोलन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नंदा पाचपुते, तालुका अध्यक्ष संगीता इंगळे, मनीषा माने, रजनी क्षीरसागर, शोभा म्हस्के, गंगुबाई रोडे , भारती जगताप, स्वाती थोरात, रेखा पठारे, शारदा व्यवहारे, मंजुळा कविटकर, छाया देशमुख, वैजयंती ढवळे, यांच्या सह अनेक अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

27 COMMENTS

  1. Did you know notes like these that come through your website’s contact page can actually be an effective method to get more sales for your business? How exactly do we do this? Super easy, we craft an ad text like this one for you and we mass post it to thousands website contact forms on any kind of website you want. Does this work? You’re living proof that they do since you’re reading this message right now What’s more, this doesn’t cost more than a hundred bucks a month! Interested in more details? drop us a line vie email here: hirthejermain@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here