दहा मिनिटात गावात शुकशुकाट
ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनो व्हायरसने शिरकाव केला असून काल भातकुडगांव येथील ३० वर्षिय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने खळबळ उडाली आहे.
हा युवक पालघर येथे एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत होता. रविवारी २८ रोजी तो पालघर येथून भातकुडगांव येथे आला होता. बुधवारी त्याला सर्दी खोकला ताप जाणवू लागल्याने आरोग्य विभागाने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आसता त्यांचा काल दुपारी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. ही माहिती समजताच भातकुडगांव येथील व्यवसायिकांनी स्वतः हून दुकाने बंद केल्याने दहा मिनिटातच वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट झाला.

संपर्कातील ८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून संबधितांना शेवगावला क्वॉरंटाईन करण्यात आले, आहे, वैद्यकीय आधिकारी सुप्रिया लुणे यांनी बोलताना सांगितले. शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड यांनी दि.१३ पर्यत सर्व सिमा बंद करून इतर सूचनाचे आदेश देण्यात आले.
दहा दिवसासाठी गांव बंद – सरपंच राजेश फटांगरे भातकुडगांव
भातकुडगांव येथील युवक नोकरीसाठी पालघरला होता.तो आपल्या मूळगावी बुधवारी आला.त्यांने स्वतः हुन घरातच काँरंटाईन करून घेतले होते. मात्र शारीरिक त्रास होत असल्याने आरोग्य विभागाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून तपासणी केली. त्यामध्ये त्याचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला.त्यामुळे भातकुडगांव व चोहोबाजूंनी तीन कि.मी.अंतरावर दहा दिवसासाठी सर्व सिमा बंद करण्यात आल्या आहेत.