Newasa Corona : रुग्ण ठाण्याचा …बदनाम मुकिंदपूर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नेवासा फाटा येथे कोरोना रुग्ण

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे ठाणे येथून आलेला अनपेक्षितरित्या कोरोना रुग्ण आढळल्याने आज नेवासा फाट्यावर कोरोना ग्रस्त रुग्ण आढळला आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजतागायत एकही रुग्ण न आढळल्याने मुकींदपूर (नेवासाफाटा) येथील ग्रामपंचायतीने आपल्या कर्मचा-यांसह इतर शासकीय व प्रशासकीय आशा ६५ जणांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविले होते.
काही दिवसांपूर्वी ठाणे येथून आलेल्या एका तहसीलच्या कर्मचाऱ्याला त्रास जाणवू लागल्यानंतर उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळी उशिरा  त्या व्यक्तीचा कोरोना रिझल्ट पाॅझिटीव्ह आल्यानंतर नेवासाफाटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुकिंदपूर ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर पाऊले उचलीत उद्या शनिवार दि.(४) पासून नेवासा फाटा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने सोशल मीडियावर एक संदेश प्रसारित केला आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, आज नेवासा फाट्यावर कोरोना ग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे मूकिंदपूर हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांना कळविण्यात येते की ४ तारखेपासून  मूकिंदपूर (नेवासा फाटा) परिसर पूर्णपणे  बंद राहील. फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील. बंद किती दिवस राहील ते आपल्याला नंतर कळवले जाईल.

दरम्यान, मुकिंदपूर ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंतीही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here