श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्यासह जिल्ह्यातील 35 जण कोरोना बाधित! रुग्णसंख्या 545वर…

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर: श्रीरामपूर विधानसभा मतदार मतदार संघाचे आमदार लहू कानडे  यांच्यासह आज दिवसभरात जिल्ह्यातील 35 नवे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. दुपारपर्यंत चोवीस रुग्ण सापडले होते सायंकाळी त्यात आणखी दहा रुग्णांची भर पडली त्याचबरोबर श्रीरामपूरशहराजवळील इंदिरानगर येथील एक रुग्ण पुणे येथे उपचार घेत असताना तपासणी केली असता तोदेखील कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार नगर शहरातील आणि सावेडीतील प्रत्येकी एक, कोपरगावमधील तीन, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, नेवासेफाटा, श्रीरामपूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील जनतेच्या समस्येबाबत आमदार लहू कानडे यांनी काही अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्या बैठकीत उपस्थित असलेले एक अधिकारी नुकतेच बाधित आढळून आले. त्यानंतर आमदार कानडे हे त्यांच्या नगर येथील निवासस्थानी होम क्वारंटाईन झाले होते. आज त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव आला आता. ते मुंबई येथे उपचार घेणार असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

दरम्यान, नगर शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने नगर शहर पुढील 14 दिवसांसाठी लॉक डाउन करण्याची घोषणा केली आहे.
जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.


आज सकाळी २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.
आज जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले.
आज दिवसभरात १५० व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.
जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या; ३६९
उपचार घेत असलेले रुग्ण : १६०
मृत्यू: १५
एकूण रुग्ण संख्या : ५४४ +1 (पुणे येथे उपचार घेत असलेला इंदिरानगर, श्रीरामपूर येथील रुग्ण)
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here