Human Interest : It’s Happens Only In India …ही व्यक्ती वापरते 2 लाखांपेक्षा अधिक किमतीचा सोन्याचा मास्क

सोशल मीडियावर मोठी चर्चा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील राहणारा एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे तो त्यांच्या सोन्याच्या मास्कमुळे. शंकर कुराडे असे याचे नाव. त्याच्या सोन्याच्या मास्कबाबत अनेकांना कुतूहल आहे. तर अनेक जण त्याला याबाबत प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे. 

सध्या कोरोनामुळे सर्वत्र मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मास्क तयार करणे शिवणे हा एक नवीनच रोजगार उभा राहू पाहतोय. अनेक ठिकाणी फेरी-विक्रेत्यांच्या सायकल किंवा हातगाडीवर कॉटन, किंवा अन्य प्रकारच्या मटेरिअलचे रंगेबीरंगी आकर्षक मास्क विकण्यासाठी पाहायला मिळत आहेत. त्याची किंमत साधारण 25-30 रुपयांपासून 70-80 तर काही 100 च्या घरात असते.

मात्र शंकर याने स्वतःसाठी संपूर्ण सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. तो आहे 2 लाख 89 हजार रुपयांचा. याबाबत शंकर म्हणतो की हा मास्क सोन्याचा असला तरी वापरण्यासाठी अतिशय हलका आहे. यामध्ये खूप छोटे-छोटे होल असल्याने श्वास घ्यायला अडचण येत नाही. त्याने त्याच्या फेसबुक, ट्विटर हँडल, व इन्स्टाग्रामवर हा गोल्ड मास्क घालून फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर हा फोटो 1000 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे. तर अडीच शे पेक्षा जास्त लोकांनी त्याला रिट्विट केले आहे. काही जणांना हे खूपच आवडले आहे. तर एकाने तर इट्स हॅपन्स ओनली इन इंडिया… अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here