Shrirampur : दारुच्या दुकानाचे कुलूप तोडून ८५,000 चा माल लंपास

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बेलापूर नगर रस्त्यावर असणाऱ्या दारुच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८५ हजार रुपयांचा माल लंपास केला. सकाळी दुकान उघडण्यास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. बेलापूर पोलिसांनी तातडीने डाॅग स्काॅडला पाचारण केले.

बेलापूर नगर रस्त्यालगत के जी गोरे यांचे देशी दारुचे दुकान आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यास गेले असता दुकानाचे कुलूप उघडे असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने बेलापूर पोलिसांना घटनेची खबर दिली. बेलापूर पोलिसांनी तातडीने नगर येथील डाॅग स्काॅडचे पोलिस उप- निरीक्षक एस बी बावळे, आर आर विटेकर, पी एन डाके,वाहक एस आर रोकडे, यांना पाचारण केले.

हे पथक डाॅग मिस्कासह बेलापूरात पोहोचले चोरट्यांनी कुलूप तोडताना वापरलेली काही हत्यारे तेथेच पडलेली होती. त्या हत्याराच्या वासावरुन मिस्का डाॅग काही अंतरावर गेला व परिसरात घुटमळला यावरुन चोरटे वाहनातून आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोरे यांच्या म्हणण्यानुसार भिंगरी दारुचे २६ बाॅक्स तसेच एक बिअरचा बाॅक्स असा 80 हजार रुपयाचा माल व गल्ल्यातील पाच हजार रुपयाची चिल्लर, असा ८५ हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे. बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ हे पुढील  करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here