प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

वैजापूर- तालुक्यातील नांदूर ढोक येथील नितीन गाढे (वय २०वर्षे ) हा तरुण आज सकाळी आंघोळीसाठी बाभुळगाव गंगा शिवारातील गोदावरी नदीत पात्रात गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तरूणाचा नदीत पात्रात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर विरगाव पोलिस घटनास्थळी धाव घेत स्थानिक अट्टल पोहोण्याच्या मदतीने त्या तरूणाचा नदी पात्रात तीन ते चार तासाच्या अथकाने प्रयत्नाने त्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. तो तरूण मोल मजुरी करत होता.