Kopargaon : कारच्या धडकेत सायकलस्वार ठार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले सुरेश परशराम पाडेकर (वय-४५) हे सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी जवळके येथे सायकलवरून जात होते. यावेळी धोंडेवाडी समोरून येणाऱ्या व वावीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंडाई क्रेटा (क्रं.एम.एच.१७ बी.एक्स.७२११) या कारने जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सायकल चालक सुरेश जागीच ठार झाले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. धडक देणारी कार ही साकुरी येथील असल्याचे समजते.

दरम्यान अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. मात्र, कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी सावधगिरी राखत अंजनापूर मार्गे रांजणगाव देशमुखच्या दिशेने भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या कार चालकाला नजीकच्या ग्रामस्थांना सावध करून ही कार पकडून दिली आहे. ही कार दीपक रोहोम यांची असल्याचे समजते. या घटनेनंतर मयत सुरेश पाडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिर्डी येथील रुग्णालयात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here