Shrirampur : ‘ती’ रुग्णवाहिनी गर्दीत थांबली आणि सर्वांची धावपळ उडाली

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – केसापूर ता. राहुरी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या घशातील स्ञाव तपासणीसाठी पाच व्यक्ती रुग्णवाहिनीतून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिनी आचानक देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात गर्दीच्या ठिकाणी येवून थांबते आणि सर्वांची धावपळ उडते. रुग्णवाहिनी चालकास रुग्णवाहिनी पुढे उभे करा, असे सांगितले असता. त्या चालकाने अर्वाच्च भाषेत येथील नागारीकांना बोलत होता. सुमारे अर्धातास रुग्णवाहीनी एका जागेवर थांबून होती. तर संशयित रुग्ण रस्त्यावर चकरा मारीत होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केसापूर ता. राहुरी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ व त्यांचे सहकारी यांनी संपर्कातील व्यक्तीचा घशातील स्ञाव तपासणीसाठी पाच व्यक्ती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी दुपारी दोन वाजता रुग्णवाहिनीस पाचारण करण्यात आले होते. माञ, रुग्णवाहिनी क्रमांक एम एच 14 सी.एल 0578 सायंकाळी सहा वाजता केसापूरात आली.

संशयित व्यक्तींना घेऊन ती देवळाली प्रवरात सात वाजता आली. रेफर पेपर घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दीड किमी अंतरावर थांबली तीही सोसायटी चौकातील आण्णासाहेब पा. कदम यांच्या पुतळ्यासमोर काही जागरुक नागरिकांनी रुग्णवाहिनी पुढे नेऊन उभी करण्याची विनंती केली. त्यावेळी रुग्णवाहिनीचा चालक भ्रमणभाषवर निवांत गप्पा मारीत होता. रुग्णवाहिनी पुढे घेण्यास सांगितली असता चालकास राग अनावर झाला. उद्धट पणाची भाषा वापरत आम्ही तुमची सेवा करतो याचे देणे घेणे नाही. येथे रुग्णवाहिनी उभी केली तर तुम्हाला कोरोना होणार आहे का? असे उत्तर चालकाकडून दिले गेले.

उपस्थितांपैकी एकाने वैद्यकिय अधिकारी मासाळ यांना भ्रमणभाषवर संपर्क साधला. या चालकाने वैद्यकिय अधिकारी मासाळ यांनाही उद्धटपणाची भाषा वापरली. संशयित व्यक्तींचे रेफर पेपर न घेता सुसाट वेगाने नगरच्या दिशेने निघून गेला. परंतू त्या रुग्णवाहिनीने माञ धावपळ उडवली. रुग्णवाहिनी चालकाची वैद्यकिय अधिकारी यांनीही वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली असल्याचे समजते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here