Shrirampur : वडाळा महादेव येथे तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – वडाळा महादेव येथे तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला आहे. विहिरीवर चप्पल आढळून आल्याने नागरिकांनी विहिरीत पाहिले असता ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तालुक्यातील वडाळा महादेव येथील संकेत सुभाष कसार (वय२२वर्ष) या तरुणाची शिवारात त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. संकेत कसार हा दुपारनतंर काही शेतकऱ्यांना परिसरात आढळून आला होता. संध्याकाळी विहिरीवर चप्पल आढळून आल्याने संकेत कसार तरुणाची चप्पल असल्याचे लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखत नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे यांना माहिती कळविली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोपट खराडे, किरण पवार, यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर घटना ही वडाळा महादेव व भोकर शिवावर असल्याने सदर विहिरीचे क्षेत्र भोकर शिवारात येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here