प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ

संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित सर्वाधिक रुग्ण असलेल्या कुरण या गावात मुंबईवरून आलेल्या काही नागरिकांनी ग्रामसेवक गंगाधर राऊत यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली होती. शिवीगाळ करणाऱ्यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांशी ही या जमावाने हुजत घालत पोलीस गाडी अडविली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी या नऊ जणां विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
तालुक्यातील या गावात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावाकडे अधिक लक्ष दिले आहे. जाकिर समशेर शेख व त्याचे कुटुंबीय मुंबई घाटकोपर येथून कुरण येथे आले आहे. प्रशासनाला ही माहिती समजतात त्यांनी या सर्वांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. याचा जाकिर शेख याला राग आला. त्याने ग्रामसेवक राऊत यांना मोबाईलवरून शिवीगाळ केली होती. त्यावेळी राऊत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी यांनी पुन्हा ग्रामसेवक यांना मोबाईलवरून धमकी दिली त्यानंतर राऊत यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात फोन करून घडलेला प्रकार कळविला.
पोलीस निरीक्षक अभय परमार हे आपल्या सहकाऱ्यांसह कुरण येथे आले असता जमावाने गाडी अडविली होती. ग्रामसेवक राऊत यांनी तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी जाकिर समशेर शेख,जहागीर शामिर शेख, जमशेत शामिर शेख, शादाब जाकीर शेख अर्सलान जाकीर शेख, शाहीन जाकीर शेख, यास्मिन समशेर शेख, वासिम समशेर शेख, कयूम मोहम्मद हुसेन, सर्व राहणार घाटकोपर हल्ली कुरण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.