Corona : पुण्यातील भाजपचे माजी आमदार व विद्यमान महापौर कोरोनाच्या विळख्यात

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पुण्यातील हडपसर येथील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर व विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतःहून ट्विट करीत ही माहिती दिली आहे. 

“दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.” असे आवाहन टिळेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उचार सुरू आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही लवकरच बरे होताल असे रिट्विट केले आहे.

तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महापौरांसह 5 नगरसेवक आणि एका उपायुक्तांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यातील 4 नगरसेवक हे कोरोनामुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here