Newasa : भेंडा खुर्दच्या माजी सरपंच कुसुमताई नवले यांचे निधन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भेंडा – तालुक्यातील भेंडा खुर्दच्या माजी सरपंच कुसुमताई विजयकुमार नवले (वय 55 वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांचे मागे पती, तीन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. भेंडा खुर्द ग्रामपंचायतीच्या नऊ जागांवर सर्वच महिला सदस्यांची बिनविरोध निवड व प्रथम महिला सरपंच आणि उत्तम प्रशासक, आदर्श गृहिणी म्हणून त्यांचा लौकिक आहे.

ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले यांच्या त्या भावजय, भेंडा खुर्द सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार नवले यांच्या पत्नी, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती दीपक पटारे यांच्या त्या भगिनी होत.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी भेट घेऊन नवले परिवाराचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here