Kopargaon : अवैध शस्त्र विक्री प्रकरणी आरोपीला दोन दिवसाची कोठडी !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव – येवला तालुक्यातील पाटोदा जवळ अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-या आरोपीला न्यायालायाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.  

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस चार कि.मी.अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्यमार्गावर साईधाम कमानीजवळ पाटोदा ता.येवला येथील आरोपी नामदेव रामदास बोरणारे (वय-४३) हा आपल्या मारुती एस.एक्स.४ (क्रं.एम.एच.४३ ए. जे.२७०९) या गाडीत बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी कोपरगाव शहर पोलिसानां मिळाली होती त्यांनी या नंतर टाकलेल्या धाडीत या आरोपी जवळील विक्रीसाठी असलेले एक पिस्तूल,एक मॅगझीन,जिवंत काडतुस,एक एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवजासह आरोपी जेरबंद केला होता.त्यामुळे कोपरगाव,येवला परिसरात खळबळ उडाली होती.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध गु.र.नं.२४५/२०२०,आर्म ऍक्ट ३/२५,७ प्रमाणे आरोपी नामदेव बोरणारे याचे विरुद्ध शनिवार दि.४ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.

आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांचे समोर आरोपी नामदेव बोरणारे यास हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेतला व आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या गुन्हेगारात या घटनेने खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here