Jalna : कोरोना बाधित चार रुग्णांचा मृत्यू; जिल्ह्यात आतापर्यंत 26 जणांचा बळी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – जिल्ह्यात आज रविवारी सकाळी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 26 बळी झाले आहेत. कोरोना बाधित रुग्णांबरोबरच मृत्यूची संख्या देखील वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील जनतेतून चिंता व्यक्त केली जात आहे.

जालना जिल्ह्यात काल शनिवार दि.4 जुलैपर्यंत कोरोना बाधित 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रविवारी सकाळी जालना शहरातील गुरुगोविंदसिंग नगरमधील 50 वर्षीय व्यक्तीचा आणि गांधीनगर भागातील एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यापाठोपाठ जाफराबाद तालुक्यातील टेम्भूर्णी येथील एका 45 वर्षीय महिलेला आज रविवारी पहाटे जालना येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषीत केले.

त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन तो प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.  या महिलेचे टेम्भूर्णी येथील जवळचे नातेवाईक यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर जाफराबाद येथील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या मयत महिलेचा अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित असला तरी सदर महिलेचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असल्याची पुष्टी सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. तिसरा मृत्यू जालना शहरातील नाथबाबा गल्लीतील (पंचशील हॉस्पिटल जवळील) एका 62 वर्षीय व्यक्तीचा झाला आहे. सदर व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here