Ahmednagar : Corona : दिलासादायक बातमी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०० रुग्ण कोरोनातून बरे

आज मिळाला १५ जणांना डिस्चार्ज
अहमदनगर जिल्ह्यातील १५ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता ४०० झाली आहे. आज नगर मनपा ०९, नगर ग्रामीण ०४, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे यांनी दिली.
नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.
अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले
नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर  ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, 
गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१, आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here