प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये एप्रिल शेतकरी योजनेचा स्थानिक मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने डाटा एन्ट्री करताना जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट करावेत, अशा सूचना सर्व रेशन दुकानदार यांना देण्यात आलेल्या आहेत.
आपल्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल याची जबाबदारी संबंधित रेशन दुकानदार यांची असेल. सर्व पात्र नागरिकांनी तात्काळ रेशनद्वारे धान्य मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे संबंधित रेशन दुकानदार यांचेकडे जमा करावेत असे आवाहन केले आहे.
शासनाकडून मंजूर अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत सर्व धान्य वाटप हे केवळ ई-पॉस ही मशीन द्वारेच मिळेल, इतर कोणत्याही मार्गाने किंवा लेखी पावत्यांच्या आधारे कोणालाही धान्य मिळणार नाही. सदरील मशिनद्वारे धान्य वाटप करताना मशीन मधून ही पावती निघते ती पावती पात्र कार्ड धारकासाठीची आहे आणि ती प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येकाने स्वतःचा हक्क समजूनच मागून घेतली पाहिजे. या पावतीवर संबंधित कार्ड धारकाला किती धान्य देण्यात येत आहे आणि त्यासाठी त्याने किती रक्कम दुकानदाराला द्यावी हे दिलेले असते. जर राशन दुकानदार ही पावती देत नाही अशी तक्रार प्राप्त झाल्यास व तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल.


दरमहा 14 तारखेला रास्त भाव दुकान निहाय नवीन डाटा एंट्रीला अतिरिक्त इष्टांक ग्राह्य धरून मंजुरी देण्यात येईल व शिल्लक अतिरिक्त इष्टांक जिल्हास्तरावर राखून ठेवण्यात येईल. त्यामुळे दरमहा गाव निहाय रास्त भाव दुकाननिहाय शिधापत्रिका संगणकीकरणाद्वारे लाभार्थी यादी मधील होणाऱ्या बदलाच्या आधारे (वाढ किंवा घट या दोन्हीची) धान्य मंजुरी देण्यात येणार आहे. या पद्धतीने दरमहा कार्यवाही सुरू झाल्याने शिल्लक इष्टांक पूर्णपणे वापरता येणार आहे. मा. जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे दि.20 जून पासून दि. 4 जुलै 2020 रोजी पर्यंत शिधापत्रिका व लाभार्थी संख्येत ८७२ वरून ८३१२ इतकी वाढ झाली आहे.
वरील शिल्लक इष्टांकाचे वाटप करताना प्रथम येणाऱ्या पात्र लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने इष्टांक वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रथम Onlineडाटा एन्ट्री करून घेणारे पात्र नागरिक येणाऱ्या पुढील महिन्यात धान्य घेण्यास पात्र ठरणार आहेत. कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व राशन दुकानदार यांनी योजनानिहाय डाटा एन्ट्री करावी.

पात्र नागरिकांनी तात्काळ रेशनद्वारे धान्य मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे संबंधित रेशन दुकानदार यांचेकडे जमा करावेत
१. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रती
२. दारिद्र्य रेषे मध्ये नाव समाविष्ट असल्यास ग्रामसेवकाचा दाखला ( केवळ अंत्योदय अन्न योजनेचे साठी)
३. शिधापत्रिकेमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी पूर्वी असलेल्या शिधापत्रिकेतील नावे कमी केल्याचा तहसीलदार किंवा रेशन दुकानदार यांचा दाखला.
४. अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 व 8अ चा उतारा.
५. पूर्वीची शिधापत्रिका असल्यास शिधापत्रिकेची छायांकित प्रत.
६. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
७. कुटुंबातील जेष्ठ यांच्या नावे केलेला अर्ज (स्वयंघोषणापत्रसह)
८. अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रीचे चे दोन फोटो, त्यावर अर्जदाराची सही करून जोडावे.
९. तलाठी /मंडळ अधिकारी यांचा अभिप्राय.
१०. रहिवासी पुरावा (लाईट बिल/ पीटीआर /भाडे पत्र /आधार कार्ड इ.)
११. गॅस कार्डची छायांकित प्रत, असे सचिन खाडे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी कळविले आहे.
dutasteride vs finasteride – http://finasteridepls.com/ celebrities on propecia
buy tadalafil online safely – tadalafil generic online purchasing tadalafil online