Kada : एकाच रात्रीत चोरट्यांनी घरासह पाच दुकाने फोडली

0
हजारोचा ऐवज लंपास; नागरिकांत भयभीत
येथील मुख्य बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांच्या टोळीने एका घरासह पाच ठिकाणी दुकानांची लोखंडी शटर उचकटून हजारो रुपयाची रक्कम लांबवून पलायण केल्याची खळबळजनक घटना घडली. त्यामुळे पुन्हा एकदा चोरांच्या दहशतीने कड्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील मुख्य बाजारपेठेला अज्ञात चोरांनी लक्ष करुन दहशत निर्माण केली. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांच्या टोळीने एका घरासह पाच दुकानांचे लोखंडी शटर उचकटून प्रत्येकाच्या गल्ल्यातील हजारो रुपयांची नगदी रक्कम लांबवल्याची घटना घडली. विशेष म्हणजे गस्तीवर असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन चोरट्यांनी ठिकठिकाणी डल्ला मारला आहे.
मराठ गल्लीतील एका घरासह तीन कापड दुकान, एक किराणा दुकान व चहाच्या हाॅटेलची चोरी करण्यात आली. एका हाॅटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चोरी करताना स्पष्ट कैद झाल्याचे दिसत आहेत. आष्टीसह कड्यात सतत होत असलेल्या चो-यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. आष्टी तालुक्यात पोलिसांचा दरारा संपल्यामुळे दिवसेंदिवस चोरट्यांसह अवैद्य धंद्यावाल्यांचे मनोधैर्य वाढत असल्याचे नागरीकांत उघडपणे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here