Corona: संगमनेर तालुक्यात कोरोनाची समूहबाधा… एकाच वेळी तेवीस नवे रुग्ण!

कुरण गावात रुग्णसंख्या 38 वर

तालुक्याच्या रुग्ण संख्येचे दीड शतक पूर्ण

विकास वाव्हळ।राष्ट्र सह्याद्री


संगमनेर :
आज रविवार संगमनेरकरांना शॉक देणारा ठरला. आज तालुक्यात एकूण 23 कोरोना बाधित रुग्ण सापडले ही बातमी ऐकून संगमनेर हादरले आहे. आज दुपारी शहतील एक महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता तर आज उशिरा तालुक्यातील कुरण गावातुन एकाच वेळी 22 जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे ही संख्या पाहून अक्षरशः संगमनेरकरांना शॉक बसला. संपुर्ण तालुका हादरला आहे तर प्रशासन देखील चक्राऊन गेले आहे.

तालुक्याला काल विक्रम करत दोनअंकी संख्येने कोरोनाच्या विषाणूंनी एकाच वेळी विक्रमी 13 रुग्ण आढळल्याचा धक्का दिला होता. या धक्यातून संगमनेरकर सावरतोना सावरतो तोच आज दुपारी एक व रात्री एकाच वेळी कुरण गावातून थेट 22 रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे संगमनेरकररांनी दिडशेचा आकडा ही अलगत पार केला आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीत भर पडली आहे.तालुक्यातील कुरण गावानेच चक्क 38 कोरोना बाधित रुग्णाचा आकडा पार केला आहे. त्यामुळे हे संपूर्ण गावच आता हॉटपॉट ठरले आहे.

संगमनेरचा हा आकडा पाहून संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील एकाच तालुक्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज तालुक्याच्या रूग्ण संख्येत एकाच दिवशी तब्बल 23  रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्ण संख्या दीडशे झाली आहे. हा आकडा पाहून प्रशासन ही हादरले आहे

संगमनेर तालुक्यात काही आठवड्यापासून प्रत्येक शनिवार अथवा रविवारी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण सापडन्याचे चक्र सुरू आहे  काल शनिवारी एकाच दिवशी 13 तर आज रविवारी थेट 23 कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने अतिशय वेगात हे चक्र फिरून संगमनेर कराच्या काळजीत भर घालणारे ठरले आहे

आज दुपारी नायकवाडपुरा परिसरातून बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका 46 वर्षांच्या महिलेला बाधा झाल्यानंतर रात्री कुरण गावात  तब्बल 22 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने संगमनेर सह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. आजच्या तेवीस रुग्ण संख्येमुळे संगमनेर तालुक्याने कोरोना बाधितांची संख्या 150 वर जाऊन पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here