Shrigonda : कोळगाव येथे ५ जणांना कोरोनाची लागण, २ पुरुष व ३ महिलांसह एकूण ७ रुग्ण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आणखी ५ कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ७ झाल्याने कोळगाव परिसरात तसेच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पांढरेवाडी येथील 55 वर्षीय वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली असताना दि.3 जुलै रोजी आणखी एक 45 वर्षीय तरुणाला कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील एकूण १९ जणांना क्वारंटाईन करून त्यांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल रात्री उशिरा आल्यानंतर १९ पैकी ५ जणांची कोरोना टेस्ट पोजिटिव्ह आली ५ पैकी २ पुरुष तर ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले.
कोळगाव येथे एकूण ७ कोरोना रुग्ण झाल्याने कोळगाव परिसरात तसेच तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत. याचा आरोग्य विभाग कसून शोध घेत आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता घेणे गरजेचे आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here