National : ड्रॅगनला वठणीवर आणण्यासाठी अजित डोभाल आखणार रणनिती

0

चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच राज्य सल्लागार वांग यी यांच्याशी चर्चा

भारत चीन तणावाला आता आठ आठवडे पूर्ण होत आहे. मात्र, अजूनही हा तणाव निवळत नाहीए. ड्रॅगनला वठणीवर आणण्यासाठी सरकार आता आणखी काही पावले उचलत आहे. आतापर्यंत आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने चीनचे अनेक डाव फसवले आहेत. त्यानंतर आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. डोभाल लवकरच चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच राज्य सल्लागार वांग यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

अजित डोभाल हे गेल्या अनेक दिवसांपासून लडाखच्या सीमा भागात आहेत. पंतप्रधानाांचा लडाख दौरा हेही त्यांचीच रणनिती होती. डोभाल यांनी पाकिस्तानला अनेक वेळा धोबीपछाड दिला आहे. चीनला ताळ्यावर आणण्यासाठी डोभाल भारताचे चाणक्य ठरतील का याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here