Shrirampur : कोरोना रुग्ण आढळलेला परिसर सिल तर बेलापूरगाव चार दिवस बंद ठेवण्याचा कमिटीचा निर्णय

2
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बेलापूर – कोरोनाचा रुग्ण आढळलेला २०० मीटरचा परिसर पूर्णपणे सिलबंद करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या. बेलापूरगाव चार दिवस कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.

कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या परिसराची उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पहाणी केली. यावेळी बंद करण्यात आलेल्या परिसरातून नागरिक ये जा करत असल्याचे निदर्शनास आले असता हा परिसर पूर्णपणे सिल करु एकाही व्यक्तीस बाहेर पडू देऊ नका. परिसरातील सर्वांची आरोग्य तपासणी करा. गावात फवारणी करा त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करा, अशा सूचना प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या.

यावेळी कामगार तलाठी कैलास खाडे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ ग्रामसेवक सग्रांम चांडे पोलीस पाटील अशोक प्रधान वैद्यकीय अधिकारी देविदास चोखर उपस्थित  होते. यावेळी परिसरातील साडेचारशे कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली असून संपर्कात आलेल्या सात जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. चोखर यांनी सांगितले. तसेच सांबधित रुग्णच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे अवाहनही डॉ. चोखर यांनी केले आहे.

दरम्यान, ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांनी कोरोना समितीची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चार दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. गावात फवारणी करण्यात यावी. जे नियम पाळणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची नोंद करावी.

बैठकीत ठरलेल्या विषयावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक सरपंच राधाताई बोंबले उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके अभिषेक खंडागळे पोलीस पाटील अशोक प्रधान, सुनिल मुथा, पत्रकार देविदास देसाई, अशोक गवते, गोविंद वाबळे, प्रशांत लढ्ढा, शांतीलाल हिरण, राजेश खटोड, अशोक पवार, प्रफुल्ल डावरे, विशाल आंबेकर प्रविण बाठीया चंद्रकांत नाईक आदि उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here