Jalna : शहरातील 44 संशयित रुग्णांसह जिल्ह्यात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना शहरातील 44 रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण 49 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून 416 जणांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

जालना जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेल्या 272 नमुन्यांपैकी 163 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 49 जणांचे पॉझिटिव्ह तर 107 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या  रुग्णांपैकी सर्वाधिक 44  रुग्ण हे जालना शहरातील असून त्यात बन्सीपुरा 6,मिशन हॉस्पिटल जवळ 4,पेन्शनपुरा 3,मोदीखाना 3,संभाजीनगर 2,पोलास गल्ली 2,दुर्गामाता रोड 5,हॉटेल अंबर जवळ 1,चौधरी नगर1,शाकड नगर1,जेईएस कॉलेज जवळ 1,नाथबाबा गल्ली पंचशील हॉस्पिटल जवळ 1,
दुःखीनगर 1, मस्तगड 3, कृष्णकुंज 1, हकीम मोहल्ला 1, गोपाळपुरा 1, लक्ष्मीनगर 1, घनसावंगी (गणपती गल्ली ) 1 तर बदनापूर येथील 1, घनसावंगी येथील 3,अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील 4 आणि जालना तालुक्यातील बाजीउमरद येथील एका रुग्णाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अद्याप प्रयोग शाळेकडे 109 संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून आतापर्यंत एकूण 26 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर 332 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here