Shrigonda : अज्ञात चोरट्यांकडून घरात घुसून जबरी चोरी, तब्बल 50,000 चा मुद्देमाल लंपास

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील वडाळी या ठिकाणी रविवारी अज्ञात चोरट्यांनी शेतमजूर महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून मारहाण करीत अंगावरचे दागिने हिसकावून फरार झाले. घटनेत जवळपास 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. छाया नारायण कोतकर (वय 40, रा. वागरकर मळा, वडाळी, धंदा शेतमजुरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.  

फिर्यादी छाया सुभाष वागस्कर या सर्व काम आटोपून रात्री 10 वाजता दरवाजाला कडी लावून झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर 2 ते 3 च्या दरम्यान दरवाजा ढकलण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. कुत्र किंवा मांजर असेल असे समजून छाया या पुन्हा झोपल्या. त्यानंतर पुन्हा आवाज आल्याने त्यांनी शेजारील नारायण वागस्कर यांना फोन लावला. यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्ती दरवाजाच्या फटीतून हात घालून दरावाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत दोन चोरटे घराचा दरवाजा तोडून आत घुसले होते.

त्यांनी फिर्यादी यांना मारहण करीत त्यांचे तोंड दाबून मंगळसूत्र व कानातले हिसकावून तोडून नेले. त्यामुळे त्यांच्या कानातून रक्त निघायला लागले. यावेळी एक जण बाहेर लक्ष ठेवत होते. चोरट्याने फिर्यादी यांचा मोबईल पायाखाली टाकून फोडून दिला. नंतर पत्र्याची पेटी घेऊन ते समोरील शेतात पळून गेले. जाताना त्यांनी गावातील राजेश मनोहर राऊत,अनिल मारुती वागसकर, निलेश अशोक शिंदे यांची दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर दोन अज्ञात चोरांचे वर्णन खालील प्रमाणे आहे. फिर्यादी गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले हिसकावणारा इसम वय -20 ते 25 वर्षे , रंग- सावळा , उंची- अंदाजे 6 फुट , बांधा – सडपातळ , डोळे – मोठे , कपाळ- पुढे आलेले, केस लांब, पोशाख- फुल पँट फिक्कट निळ्या रंगाची व जरकीन घातलेले घराच्या बाहेर जायचा तो इसम पूर्ण तोंड व डोकं बांधलेले वय -20 ते 25 वर्षे , रंग- सावळा , उंची- अंदाजे 5.5 फुट , बांधा – मध्यम , डोळे- मोठे , कपाळ- पुढे आलेले, पोशाख – काळया रंगाची फुल पँट फि व जरकीन घातलेले.

चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे 10 हजार रु.कि.चे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र 40 हजार रु.कि.चे एक तोळे वजनाचे कानातील कर्णफुले वेलला फुले असलेली जु.वा.किं.अं. एकुण 50हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनास्थळी विभागीय पोलीस उप अधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक अरविंद माने तसेच सायंकाळी उपाधीक्षक सागर पाटील यांनी भेट दिली.

2 COMMENTS

  1. Thanks for every other wonderful post. The place else could anybody get that kind of info in such an ideal manner of writing? I’ve a presentation next week, and I am at the look for such info.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here